झपाटलेला ट्रेक
झपाटलेला ट्रेक जून चा पहिला आठवडा चालू होता. उन्हाळा संपून आता पावसाळा सुरु होणार होता. तसे बदलही वातावरणात जाणवत होते. नुकतेच मला वरिष्ठानी नोकरीच्या बंधनातून मुक्त केल्यामुळे वेळ च वेळ होता. भटकायची जणू पर्वणीच. २ दिवस मस्त सह्याद्रीत व्यथित करायचे मनसुबे आखले गेले. डोंगर रंग ठरली. तैलबैला-सवाष्णी घाट- धोंडसे मार्गे सुधागड. ठरलं. जोडीला कोणी मिळालंच नाही, म्हणून नियोजनात बदल नाही. शनिवारी सकाळी सकाळीच मुंबईहुन तैलबैला कडे निघालो, गाडी भांबुर्डयाची होती तिकीट काढताना मूड बदलला व सरळ घनगड ला गेलो. दुपारी घनगडावरून समोर सुधागड पाहत न्याहारी सोडली तर उजवीकडे तैलबैला रात्री मुक्कामाला खुणावत जो मुक्काम सुधागडावर होता. संध्याकाळी तैलबैला गावात मुक्काम करून सकाळी निवांत पणे सवाष्णीकडे निघाल. मळभ भरून आलेले. एकटाच भटकत होतो भुतासारखा रानोमाळ. घाट उतरणीला जरा एका झाडाखाली गार सावलीला बसलो. १० मिनिटासाठी आडवा झालो न तब्बल २ तासांनी उठलो. भयंकर गाढ झोप. दचकून उठलो घड्याळ पाहिलं ३ वाजलेले, वातावरणात एक प्रकारची अस्वस्थता जाणवत होती. माझी होती कि वातावरणाची माहिती नाही. उरलेला घ