Posts

Showing posts from June, 2016

दुर्गराज ते दुर्गदुर्गेश्वरमार्गे अग्याची नाळ - एक थरारक प्रवास

Image
राजगड ते  रायगड मार्गे अग्याची नाळ.                                           - एक थरारक प्रवास.  खूप  दिवसापासूनची इच्छा पूर्ण होणार होती, राजगड ते रायगड हा ट्रेक पूर्णत्वास जातोय. तारीख ठरली १-२-३ ऑक्टो.  प्रचंड उत्सुकता होती उत्साह शिगेला पोहोचला होता. मानसिक शारीरक तयारीही झाली होती, फक्त राजगड ते रायगड बाकी होत.              ओंकार नायगांवकर या उस्मानाबाद च्या अवलियाच्या प्रयत्नातून खर तर हा योग जुळून आला होता. ३ महिने आधीच ग्रुप तयार झाला चिक्कार भरणा झाला, नियोजन झाले, राजगडच्या पायथ्याशी पाली गावात नाना धुमाळ देशमुख यांच्या घरी भेटण्याचे नक्की झाले. २३ उत्साही तरुण प्रत्यक्ष सहभागी झाले. यामध्ये मुंबईतून मी, रवि दादा, समीर शिर्के, पार्टे व अमित तर पुण्यातून राहुल बुलेबुले व सहकारी. उस्मानाबाद वरून ओंकार दादा, शैलेशदादा, रोहित आदी. तर कोल्हापूर वरून सुनील अडसुळे व सहकारी अशी विविध ठिकाणांवरून मांदियाळी जमली.   हां. . . तर आमचे (मुंबईकर्स) चे adveture पनवेल पासून च सुरु झालेले, १:३७ ला स्वारगेट ला उतरलो. ६:३० ची बस होती निवांत झोपायचं होत पण मच्छरानी त्यावर पाणी  फेरले. मग