Posts

Showing posts from April, 2016

आठवणीतील माणिकगड

Image
आठवणीतील माणिकगड  पट कथेचे नाव- आठवणीतील माणिकगड    लेखन- योगेश आलेकरी विषय- गिर्यारोहण ठिकाण - सह्याद्री पर्वतराजी कलाकार- योगेश , समीर , महेश  हा… तर झाले असे कि, आम्ही माणिकगडावर गिर्यारोहण करायला निघालो व चित्रविचित्र अनुभव घेऊन परत आलोही हि, त्याबद्दल घेतलेला हा धावता आढावा- इकडे महाराष्ट्रात सालाबादप्रमाणे यंदाही पावसाळा आला होता. नेहमीप्रमाणे तो मे च्या काहीसा नंतर व ऑक्टोबर च्या काहीसा आधी आला पैकी ऑगस्ट महिन्यातील एका दिवशी आम्ही वर उल्लेखलेल्या गडावर जायचं ठरवल अगदी अचानक !! मी, महेश, समीर व सोबतील चिले सर यांचे एक पुस्तक. पैकी आमची तत्कालीन परिस्थिती अशी कि, मी काहीसा तुरळक आजारी, समीर सक्काळीच रक्तदान करून आलेला(त्यामुळे झालेला उशीर), व महेशराव रात्रभर जागरण झाल्याने डोळे लाल करून आलेला.    नियोजन (????)अचानक झाल्याने गडाबद्दल व वाटेबद्दल पुरेपूर माहिती घेता आली नव्हती. मी कोणत्याच मनस्थितीत नसल्याने नियोजन व पथदर्शन या दोघांवर सोपवलेले.  पनवेल वरून ११:४५ ची बस पकडून १२:४७ ला वाशिवली गावात दाखल. पुढे खानाखजाना उरकून वडगावात २:०० IST  वा. दाखल . घाईनेच गाव