Posts

Showing posts from December, 2015

कोकणात बहरतय ग्रामीण पर्यटन.

Image
  कोकणात बहरतय ग्रामीण पर्यटन.  कोकण म्हटलं कि डोळ्यासमोर येतात उंचच माडाची बने, दूरवर पासारलेला अथांग समुद्र, शुभ्र किनारे, चौपाट्या,मग  त्यासोबत नितांत सुंदर अशा किनार्यांवर पर्यटकांची रेलचेल, विक्रेत्यांची भाऊगर्दी अगदी नेहमीसारखाच. मुंबईतील धावपळीतून कुठेतरी दोन दिवस शांततेसाठी आपण नेहमीच कोकणाला पसंती देतो. पण जर वरील सर्व अनुभवायचे असेल पण गर्दी नको असेल तर कोकणातील  ग्रामीण पर्यटन ठिकाणाशिवाय पर्याय नाही .तेही अपरिचित अशा ठिकाणी असेल तर मस्तच . सूर्यास्त   Rayari kinara  कडून अशाच एका ठिकाणी जाणे झाले. दिघी बंदराच्या दक्षिणेला ७ किमी वर असलेल्या सार्वा या गावी. एका बाजूला समुद्र व एका बाजूला घनदाट अरण्याने गजबजलेली डोंगररांगेच्या किंचितश्या उतारावर एकमेकांना खेटून, कौलारू  पण पारंपारिक कोकणचे दर्शन घडवणारी टुमदार घरे दिसतात गाव संपताच पायथ्याला समुद्र. अशा निसर्ग सुंदर ठिकाणी सार्वा गाव वसले आहे. ७०/८० घरांची वस्ती पण एकही कोळीबांधव नसल्याने व्यावसायिक मासेमारी होत नसल्याने साहजिकच माशांच्या दर्पापासून मुक्ती मिळते.     मुंबई पासून अंदाजे २०० किमी वर असलेले या गावी  मुं