Posts

Showing posts from October, 2014

ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा…

ट्रेकरची लक्षणे अर्थात ट्रेकर कसा ओळखावा…  कुणीतरी ईमेल केले होते… जसेच्या तसे इथे पोस्ट  करतोय. ज्याने कुणी लिहिले आहे  त्याच्या निरीक्षणशक्तीला दाद द्यायला हवी…  १.चेहरा: बहुधा रापलेला . दाढ़ी मिश्यांचे नक्कीच  काहीना काही कीडे केलेले असतात .  त्यातहीकिंवा सैफच्या टशन स्टाइल  मिश्या यांच्या फार आवडत्या . काही ट्रेकर्स  असेहीअसतात जे दाढ़ी मिश्या ठेवत नाहीत  त्यांना मुली असे म्हणतात  २.केस: एकतर अतिशय बारीक़ कापलेले  किंवा खुप लांब ..मुले मुली दोघांचेही  ३.वेशभूषा: आठवड्यातील दिवसाप्रमाणे  * सोमवार ते गुरुवार: चेक्सचा शर्ट , जीन्स, पायात  चप्पल. खांद्याला चिंगुली सैक हीला ट्रेकच्याभाषेत  पिट्टूम्हणतात . त्याला एखादा snap  किंवा रंगीबेरंगी स्लिंग जरुर  अडकवलेली असते.  * शुक्रवार रात्र: निघायची तयारी …ख़राब  फीटिंगची पण प्रचन्ड comfortable ट्रैक पँट ,  Bombay Natural History Society चे  कुठल्या तरी दुर्मिळ पक्ष्याचा फोटो असलेले  टी शर्ट , कमरेला वेस्टपाउच (ही एकखासचीज  आहे …हिच्याविषयी विस्ताराने पुढे येईलच ) ,पायात  अनुभवी बनचुका ट्रेकरअसल्यास स्लीपर / मध्यम  अनुभवी असल्यास फ्लोटर्स

ट्रेकर्सचे वाक्प्रचार...

आमच्या भटकंतीमध्ये काही वाक्प्रचार सर्रास वापरले जातात, ज्यांमुळे ट्रेकला रंगत चढते. त्यातले काही जसे आठवले तसे इथे देत आहे. आपल्याला आवडतील अशी अपेक्षा आहे. १. भा. स्टॅ. टा. वर पोचणे: नियोजित वेळेपेक्षा पोचायला अर्धा पाऊण तास उशीर होणे २. गाडी वेळेवर सुटणे: सकाळचे विधी सुरळीत होणे. ३. सकाळी गाडीला उशीर होणे / रद्द होणे: 'गाडी वेळेवर सुटणे' च्या उलट स्थिती होणे. ४. सगळ्या बाजूंनी शिट्ट्या मारणे: गाडी रद्द झाल्यानंतरची स्थिती. ५. बुंगवणे: दुचाकी किंवा चारचाकी ७०-८० च्या वरच्या वेगाने चालवणे. ६. फोटो काढत काढत मिनिटांत वर पोचणे: फारच छोटा गड/किल्ला असणे. ७. ट्रेक ’जरा’ स्पेशल असणे: खूप अवघड ट्रेक असणे. ८. माकड होणे: अति वाईट अवस्था होणे. एखादी गोष्ट बाकीच्यांना जमूनपण आपल्याला न जमणे. ९. शाहरुख खान होणे: अवघड ठिकाणी (सहसा रॉक पॅच उतरताना) बोबडी वळणे. १०. ड्रायक्लीन होणे / करणे: ओव्हरनाइट ट्रेक नंतर सकाळी फक्त तोंड खंगाळून तयार होणे (दुसरा पर्यायच नसतो). ११. आजारी पडणे: ऑफिसला दांडी मारणे. १२. विकेट जाणे: लग्न ठरणे / होणे. १३. हिट विकेट आऊट होणे: प्रेमविवाह / लव्ह मॅरेज करणे. १४