Posts

Showing posts from January, 2014

सफर हरिहर गड - अंजनेरी - रामसेज ची भाग - २

भाग -१     बरीच पायपीट झाल्याने भुकेने सार्वजन व्याकूळ झालेले. अन् जेवणाचा मेन्यु पण भन्नाट होता चपाती, टोमाटोची व बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी, पापड, लोणचे व महाभयंकर असा हिरव्या मिर्चीचा ठेचा बस् !!!!! भुकेचा तडाखा एवढा मोठा होता कि, अर्धे पोट भरल्यावर सर्वांच्या संवेदना जाग्या झाल्या व ठेच्याची जहालता जाणवली. हाsss हुssss श्श्शssss हुश्यss अशा उद्गारांनी गाझाब माजवला. डोळे तोंड नाक पाणीदार झालेले ;) त्या धुमश्चक्रीत ठेच्याची झळ बसलेल्यान्साठी दोन ओळी -                                                                        भाजी एवढा ठेचा                    कधीच खायचा नसतो                    बिघडलेल्या सिस्टीम चा दोष                   वाढणाऱ्यावर लादायचा नसतो !!    हालचाली मंदावल्या होत्यच. घासांची वारांवारिताही न्यूनतम पातळीवर स्थिरावली होती, इतक्यात राजू सर दत्त म्हणून उभे राहिले अन् तब्बल अडीच किलो पेढे बाहेर काढले व वाटप सुरु केले. ठेच्याच्या आगीवर पेढ्याची फुंकर  मनाला दिलासा देणारीच ठरली राजू सरांचे पेढ्या पेक्षा गोड शब्दात कौतुक करून तो रसभरीत भरगच्च कार्यक

सफर हरिहर गड - अंजनेरी - रामसेज ची भाग -१

भाग - २   साठी        साहसी  खेळ खेळणाऱ्या गिर्यारोहकांना व निसर्गसौंदर्यावर लुब्ध असणार्यांना आपल्या सह्याद्रीसारखा जिवलग नाही. या सह्याद्रीच्या गिरीशिखारावरील किल्लेकोट म्हणजे आमच्या आनंदाचे खजिनेच. असाच एक खजिना लुटण्यासाठी गडवाट परिवाराकडून नाशिक जिल्ह्यातील किल्ले हरिहर गड, अंजनेरी व रणधुरंधर रामसेज अशा भ्रमंतीचे नियोजन करण्यात आले. चाकोरीबाहेरील दुर्गभेटी हे गडवाट परिवाराने जपलेले वैशिठ्यच आहे, कारण " इये "इये दुर्गाचिये नगरी, बहुत किल्ल्यांचा सुकाळ " असे वैभव असताना त्याच त्याच चाकोरीत का राहावे?? " नित्य नूतन हिंडावे !" या उक्तीप्रमाणे आमचे गिरीभ्रमण चालणार होते. अन असेही डिसेंबर संपत आला तरी मुंबईतील थंडीने थंडीची भूक काही भागवली नव्हातीच. तशी मागच्या रविवारी ढाक बहिरीच्या वनात रात्र गवतात झोपून काढावी लागल्याने भूक भागली होतीच. (नव्हे जिरलीच  होती ;) :p )…तसे नाशिक म्हंटले कि गार गार वारा, सह्याद्री, सातमाळ, नद्या, तीर्थक्षेत्रे, ऐतिहासिकता व धार्मिकता यांचा सुरेख मिलाप अन त्यातही सोबत गडवाटची म्हणजे दुग्धशर्कराच. गडवाट सोबतचा trekk चुकवणे म्हणजे म