Lords - the revenge
Lords - the revenge तब्बल 2 महिने बाईक चालवून मी लंडन ला पोहचलो. 2 दिवस स्थिरस्थावर झाल्यावर मी लगेचच लॉर्ड क्रिकेट मैदानाला भेट द्यायला गेलो. हेच ते लॉर्डस मैदान ज्याला क्रिकेट ची पंढरी मानले जाते. जिथून क्रिकेट च जन्म झाला म्हणू शकतो तेच हे ऐतिहासिक लॉर्डस चे मैदान. पण याही पेक्षा माझ्या आयुष्यात लॉर्डस चे महत्व वेगळ्याच कारणासाठी होते ते म्हणजे भारतीय क्रिकेट ला अग्रेसिव करण्याची पायाभरणी करणाऱ्या एका घटनेमुळे. आपला लाडका दादा उर्फ सौरव गांगुली त्याने इंग्लंड संघाला लॉर्डस वर अस्मान दाखवलेलं च पण Englishman Flintoff च्या उन्मादी वृत्तीला त्याच्याच भाषेत टीशर्ट काढून उत्तर दिलेले त्या लॉर्डस च्या ऐतिासिक गॅलरी ला मला भेट द्यायची होती. त्या गॅलरी मध्ये मला माझे riding jacket फिरवायचे होते आणि तिथं एक मस्त फोटो काढायचा होता मग सोबत एक मैत्रिणीला घेऊन लॉर्डस ला गेलो. चला तर त्या मागची कहाणी पाहूया..... दादाची दादागिरी ( सौरव गांगुली) साल 1999 भारतीय क्रिकेट मधील एक काळा कार्यकाळ. अझहर सारखं यशस्वी कप्तान मॅच फिक्सिंग प्रकरणात दो